आम्हाला अपेक्षित असलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती मिळाली – श्री.शांताराम भिंगुडे, संचालक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
आम्हाला अपेक्षित असलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती मिळाली – श्री.शांताराम भिंगुडे, संचालक
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन काकांच्या नेतृत्वामुळे भक्कम स्थितीत आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील पतसंस्थांची ताकद वाढत आहे. त्यांना सहकारातील पतसंस्थांविषयी तळमळ वाटते. पतसंस्थांना विरोध दर्शविणाऱ्या सहकार खात्याच्या परिपत्रकाला काकाच विरोध करू शकतात त्यामुळे आम्हाला ते आदरणीय असून फेडरेशनच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते समता पतसंस्थेचा विशेष उल्लेख करतात त्यामुळे आम्ही समताला भेट दिली. सदिच्छा भेट दिल्यानंतर आम्हाला अपेक्षित असलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती मिळाली असल्याचे कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक, चंदगड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या श्री.रवळनाथ सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक श्री.शांताराम रामचंद्र भिंगुडे यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक, चंदगड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या श्री.रवळनाथ सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक श्री.शांताराम रामचंद्र भिंगुडे, मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री.शांताराम यशवंत हजगुळकर, ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक श्री.कन्हैया प्रभाकर कुलकर्णी, चंदगड तालुका शासकीय, निमशासकीय पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री.रवींद्र सखाराम जांभळे, पं.नामदेव दुंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. प्रदीप कृष्णा कुंभार यांनी सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज, भव्य इमारत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग, समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती, घी बत्ती, कापूर, हँडवॉश, उटणे, फुलवाती, समई वाती, अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ, मास्क, पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली. त्यानंतर मुख्य कार्यालयाचे फंड विभाग प्रमुख श्री.जिंतेंद्र अमृतकर, बोर्ड सेक्रेटरी श्री.संतोष मुदबखे, कोपरगाव शाखाधिकारी श्री.आप्पा कोल्हे आणि समता महिला बचत गटाच्या महिलांनी सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर समता पतसंस्थेचे फंड विभाग प्रमुख श्री.जिंतेंद्र अमृतकर चेअरमन यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांची एशियन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू) वर संचालक आणि बहुमताने खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत चेअरमन, संचालक मंडळ, अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.