वीरशैव लिंगायत पतसंस्था पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
वीरशैव लिंगायत पतसंस्था पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न
कोपरगाव : महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वाखाली असलेल्या पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी सामुदायिकपणे प्रयत्न करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष आणि लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केली.
महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या पतसंस्थांच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. पुणे येथील अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.भगवान कोठावळे, सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सुधीर राजमाने व कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.गोपीनाथ निळकंठ यांनी केले होते.
या मेळाव्यास महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या ४२ पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेषतः अहमदनगर, नाशिक, बीड, सांगली, संभाजीनगर या भागातील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या मेळाव्यात खालील प्रमाणे ठराव करण्यात आले.
१) वीरशैव लिंगायत समाजातील बांधवांच्या पतसंस्थांना अडचणी येणार नाही याची सामुदायिकपणे दखल घ्यावी.
२) वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी आपले व्यवहार वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या पतसंस्थांमध्येच करावे.
३) वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या पतसंस्थांनी प्राधान्याने लिंगायत समाजातील समाज बांधवांना कर्ज पुरवठा करावा.
४) वीरशैव लिंगायत समाजातील सर्वच धर्मगुरूंनी आपापल्या परिसरातील पतसंस्थांशी व्यवहार करण्याचे आवाहन समाज बांधवांना करावे व आपल्या मठा चे व्यवहारही परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या पतसंस्थांमध्ये करावे.
प्रसंगी वीरशैव लिंगायत पतसंस्था मेळाव्याला उपस्थित पतसंस्था प्रतिनिधींचे स्वागत कुंभारी येथील राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.गोपीनाथ निळकंठ यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे येथील सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.सुधीर राजमाने यांनी केले. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील श्री. राजाभाऊ मुंडे यांनी भूषविले. उपस्थित पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी स्वतःचा परिचय करून देत पतसंस्थेची आर्थिक स्थिती सांगितली. तसेच स्वतः ची पतसंस्था सहकार व सामाजिक क्षेत्रात राबवत असलेल्या योजना, उपक्रमांची ही माहिती दिली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते उपस्थित चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालकांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यास तुळजापूर येथील श्री. गुरुनाथ बडूरे, श्री.शिवाजी आप्पा कपाळे, श्री.रविंद कानडे , श्री.ओमकार खुरपे , धाराशिव येथील श्री.श्रीकांत साखरे, श्री.हनुमंत भुसारी, चाकूर येथील श्री विठ्ठल माकणे, आटपाडी येथील श्री.सतिश भिंगे, नाशिक येथील श्री.बद्रीनाथ वाळेकर, श्री.धोंडूआप्पा हिंगमिरे, श्री. रविंद्र आद्यप्रभू, श्री.अनिल कोठुळे, संभाजीनगर येथील श्री. शिवाप्पा खांडकुळे, बार्शी येथील श्री.बाळासाहेब आडके, कळंब येथील श्री.सागर मुंडे, श्री.निलेश होनराव, मंगळवेढा येथील श्री.शैलेश हावनाळे , औसा येथील श्री.नितीन शेटे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.सतीश निळकंठ यांनी विशेष परिश्रम घेतले.