समता राज्यातील आदर्श पतसंस्था – सुचित्रा दिवाण, अध्यक्षा
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अद्यावत अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठेवीदारांना देण्यात येणारी सुरक्षितता व काळानुसार कामकाज पद्धतीमध्ये बदल या तीन सुत्रांनुसार समता पतसंस्था आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने झेपावत आहे. या तीन सुत्रांच्या आधारे समता पतसंस्था ही राज्यातील सहकारी पतसंस्थांना आदर्श पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुचित्रा दिवाण यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास ८ जून २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील कोथरूड येथील सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुचित्रा, उपाध्यक्षा वृषाली सुलाखे, संचालिका लता खेर, शैला कातुर्डे, रंजना दाभाडे, शीतल बुट्टे पाटील, सविता दिकोंडा, वंदना लंगोटे, सल्लागार मेधा वैद्य, सरव्यवस्थापक एकनाथ वालगुडे, वरिष्ठ व्यवस्थापक ज्योत्स्ना काशिद, व्यवस्थापक रश्मी नाडकर्णी, वसुली अधिकारी किशोर खामकर, वरिष्ठ लिपिक ऋतिका शिंदे, रोखपाल अश्विनी उभे, कनिष्ठ लिपिक संदेशा जगताप, शिपाई प्रभा गोळे, अतुल भणगे आदी पदाधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, एच.आर उज्वला बोरावके, वसुली अधिकारी जनार्दन कदम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग या राज्यातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक व आदर्श असणाऱ्या अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुचित्रा दिवाण यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी केला. समता प्रमाणे राज्यातील पतसंस्था चळवळ काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक व सक्षम पतसंस्था चळवळ बनत असल्यामुळे सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यप्रणाली आणि समता महिला बचत गटाच्या सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल सरस्वती महिला पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थेचे संचालक जितूभाई शहा, गुलशन होडे उपस्थित होते.