समताच्या मुख्य कार्यालयास भंडारा, यवतमाळ आणि शेवगाव येथील पतसंस्थांची सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

भंडारा जिल्ह्यातील विदर्भ निधी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रवीण भांडारकर यांचा सत्कार करताना संस्थेचे चेअरमन काका कोयटे
यवतमाळ जिल्ह्यातील अद्विता अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी व पुणे येथील अद्विता क्रेडिट इन्फो. प्रा.लि.चे कार्यकारी संचालक अतुल वाकोडे यांचा सत्कार करताना संस्थेचे चेअरमन काका कोयटे
समताच्या मुख्य कार्यालयास भंडारा, यवतमाळ आणि शेवगाव येथील पतसंस्थांची सदिच्छा भेट
शेवगाव तालुक्यातील गंगोत्री नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गोविंद वाणी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे व मुख्य कार्यालयाचे अधिकारी दत्ता आव्हाड
कोपरगाव : महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास ११ जुलै २०२४ रोजी भंडारा जिल्ह्यातील विदर्भ निधी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रवीण भांडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बडवाईक, यवतमाळ जिल्ह्यातील अद्विता अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी व पुणे येथील अद्विता क्रेडिट इन्फो. प्रा.लि.चे कार्यकारी संचालक अतुल वाकोडे, मॅनेजर स्वप्निल राठोड तर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील गंगोत्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गोविंद बाबुलाल वाणी, व्हा.चेअरमन अशोक रामजी अहिर, मॅनेजर भाऊसाहेब रघुनाथ जुंबड, नितीन शेषराव गोर्डे, लिपिक अविनाश सोपान खोसे, विशाल वसंत बांगर, गोवर्धन अशोक फटांगरे आदी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी १३ जुलै २०२४ रोजी सदिच्छा भेट दिली.
या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादा तथा काका कोयटे यांच्याशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग या राज्यातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर चर्चा केली तर जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी योगेश आसणे, दत्ता आव्हाड, जनार्दन कदम, कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी संस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच ११ जुलै रोजी विदर्भ निधी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रवीण भांडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बडवाईक आणि अद्विता अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी व पुणे येथील अद्विता क्रेडिट इन्फो. प्रा.लि.चे कार्यकारी संचालक अतुल वाकोडे, मॅनेजर स्वप्निल राठोड यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.१३ जुलै रोजी शेवगाव येथील गंगोत्री पतसंस्थेचे चेअरमन गोविंद वाणी व पदाधिकारी अधिकारी यांचा सत्कार कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे व मुख्य कार्यालयाचे फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम प्रमुख दत्ता आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यप्रणाली आणि समता महिला बचत गटाच्या सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.