ब्रेकिंगमहाराष्ट्र

समतात लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समतात लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेत डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून १०४ वी जयंती संजीवनी नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच समता पतसंस्थेच्या कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, जामखेड, कोल्हार, संगमनेर, अहमदनगर, येवला, नाशिक, वैजापूर, पुणे, प्रेमदान चौक (अहमदनगर), गांधी चौक (कोपरगाव) या सर्व शाखांमध्ये देखील शाखेचे सभासद, ठेवीदार, खातेदारांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्था अद्यावत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा ग्राहक व सभासदांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणारी संस्था आहे. तसेच सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रमही समता पतसंस्था राबवत आहे. समताने महाराष्ट्रातील समाज सुधारक, महापुरुष यांची पुण्यतिथी व जयंती साजरी करून एक आगळा – वेगळा उपक्रम अमलात आणलेला आहे.

कोपरगाव शहरातील ऋषीराज उल्हारे यांनी मिरज येथे वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. ही सर्वोत्कृष्ट पदवी संपादन केल्याबद्दल समता पतसंस्थेच्या वतीने त्यांचा व त्यांची आई सौ.वैशाली उल्हारे यांचा सत्कार करून सन्मान करत संस्थेच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी अण्णाभाऊ साठे स्मारक समिती अध्यक्ष सुखदेव जाधव, कोपरगाव नगरपरिषद शिक्षण समिती माजी सभापती विनोद राक्षे, रयत शिक्षण संस्था सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब नेटके, साहित्यिक, चित्रकार अरविंद शेलार, जगधनी क्लासेस व्यवस्थापिका सौ. वैशाली उल्हारे, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव सोळसे, बाळासाहेब सोळसे, अनिल जाधव, नितीन सोळसे, रवी शेलार, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे