ब्रेकिंगमहाराष्ट्र

समताच्या मुख्य कार्यालयास हडपसर व कान्हूर पठार येथील पतसंस्थांची सदिच्छा भेट

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताच्या मुख्य कार्यालयास हडपसर व कान्हूर पठार येथील पतसंस्थांची सदिच्छा भेट

कोपरगाव : महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील कल्पवृक्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष नानासाहेब सुर्यवंशी, उपाध्यक्ष राजेंद्र जैनक, संचालक रत्नाकर वाजे, तानाजी कामठे, अरुण आटोळे, रामदास सुर्यवंशी, बाळासाहेब गायकवाड, अरविंद वाघिरे, दत्तात्रय हरपळे, नितीन डहाळे, कायदेविषयक सल्लागार ॲड.सतीश रन्नवरे, सीईओ प्रदीप भापकर आणि पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील कान्हूर पठार नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती सुशीला दिलीपराव ठुबे, संचालक दादाभाऊ नवले, एम.डी. नमिता ठुबे, कायदेविषयक सल्लागार ॲड.प्रसाद शेळके आदी पदाधिकारी, अधिकारी यांनी २७ जुलै २०२४ रोजी सदिच्छा भेट दिली.

या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग या राज्यातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर चर्चा केली तर मुख्य कार्यालयाचे अधिकारी संजय पारखे, कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे, सोनेतारण अधिकारी सौ.सोनाली दवंगे यांनी संस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली.

संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते कल्पवृक्ष पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी आणि कान्हूर पठार पतसंस्थेच्या चेअरमन सुशीला ठुबे, एम.डी.नमिता ठुबे यांचा सत्कार करण्यात आला. इतर पदाधिकारी, अधिकारी यांचा सत्कार संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केला. तसेच या वेळी कान्हूर पठार पतसंस्थेच्या एम.डी.नमिता ठुबे यांनी वडिलांच्या निधनानंतर स्वतः जबाबदारी स्वीकारत पतसंस्थेची आर्थिक घोडदौड सुरू ठेवल्याबद्दल उपस्थितांनी तिचे कौतुक केले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्य प्रणाली आणि समता महिला बचत गटाच्या सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यांनी आभार मानले आणि समताच्या पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थेचे संचालक जितूभाई शहा, संदीप कोयटे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे