समता पतसंस्थेने सहकार क्षेत्रात उतुंग झेप घेत सोनेतारण कर्जात केला १५० कोटी रुपयांचा टप्पा पार
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा पोपट साळवे
समता पतसंस्थेने सहकार क्षेत्रात उतुंग झेप घेत सोनेतारण कर्जामध्ये केला १५० कोटी रुपयांचा टप्पा पार
कोपरगाव : बँकींग व फायनान्स क्षेत्रात सोनेतारण कर्ज सर्वात सुरक्षित कर्ज समजले जाते या प्रकारच्या कर्जात खाजगी फायनान्स कंपन्यानी सुरक्षित कर्ज वाटपाचे क्षेत्र परप्रांतातील खाजगी फायनान्स कंपन्यांनी व्यापलेले आहे परंतु या सोनेतारण कर्जाच्या व्यावसायात समता नागरी सहकारी पतसंस्थेने मोठी झेप घेतली असून गत दिड वर्षात आजपर्यंत १५० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्जाचा टप्पा पार करीत महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये समताने सर्वात जास्त सोनेतारण कर्ज वाटप करणारी समता पतसंस्था ही क्रमांक एकची पतसंस्था ठरली आहे.समताच्या एकूण कर्ज वाटपापैकी ३५% कर्ज वाटप सोनेतारण कर्ज असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
समताच्या १५० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्ज वाटपाचा टप्पा पार करीत असताना संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व सोनेतारण गोल्ड व्हॅल्यूअर यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. तसेच समताचे चेअरमन काका कोयटे ,सर्व संचालक आणि उपस्थित गोल्ड व्हॅल्यूअरांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्रसंगी समताचे सरव्यवस्थापक श्री सचिन भट्टड म्हणाले की,सोनेतारण कर्जातील जोखिम कमी करण्यासाठी प्रत्येक महिन्यातून एक वेळा सोनेतारणाचे पुनःमूल्यांकन करण्याची पद्धती समता ने अवलंबविली आहे तसेच या सोनेतारण कर्जाच्या सुरक्षिततेसाठी फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम तयार करून त्याद्वारे सर्व शाखांचे सोनेतारणाचे ऑनलाईन सीसीटीव्ही द्वारा प्रत्येक मिनिटाला निरीक्षण केले जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समताचे संचालक श्री संदीप कोयटे म्हणाले की, सोनेतारण कर्जाची घरपोहच सुविधा समता सुरू करीत आहे तसेच सोनेतारण कर्जाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी व कामकाजात वेग येण्यासाठी जागतिक दर्जाच्या सॉफ्टवेअर कंपन्या सोबत करार करण्यात येणार असून समताला अधिक सुरक्षितता प्रदान करणार आहोत.
तर समताचे असि.जनरल मॅनेजर (वसुली विभाग) श्री जनार्दन कदम मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,पतसंस्था मालमत्ता तारणावर कर्ज देत होत्या परंतु कर्जदार कर्ज थकबाकीत गेल्यानंतर ते कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने संस्थेविरुध्द तक्रारी करण्याचे प्रमाण वाढले आहे आपण घेतलेले कर्ज माफ करावे किंवा त्यात सूट मिळावी या उद्देशाने थकबाकीदार संस्थेविरुध्द तक्रारी करत असतो समताची थकबाकी वसुलीची पद्धत कायदेशीर परंतु कठोर आहे त्यामुळे थकबाकीदारांनी केलेल्या तक्रारींचा सामना समता ला नेहमीच करावा लागतो परंतु ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने समता यापुढेही आपले कठोर वसुलीचे धोरण,धोरणाची पद्धत सुरूच ठेवणार आहे.
याप्रसंगी समताच्या सोनेतारण विभागाचे प्रमुख श्री विवेक नगरकर, श्री कैलास कवाडे, श्री विशाल ठोळे यांचा सत्कार समताचे जेष्ठ संचालक श्री जितुभाई शहा, श्री अरविंदजी पटेल, श्री चांगदेवजी शिरोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच सोनेतारण व्हॅल्यूअर श्री अनिल जाधव, श्री आनंद भडकवाडे, श्री सुरज वडनेरे,श्री शेखर भडकवाडे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष स्थानी होते तर संचालक श्री जितुभाई शहा, श्री अरविंदजी पटेल, श्री चांगदेव शिरोडे,श्री संदीप कोयटे,श्री गुलशन होडे ,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड,ऍड गवांदे,श्री किरण शिरोडे , श्री प्रदीप साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर संस्थेचे सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक श्री संदीप कोयटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक श्री अरविंदजी पटेल यांनी मानले.