ब्रेकिंग

सौ.सुहासिनी कोयटे यांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सौ.सुहासिनी कोयटे यांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान

कोपरगाव : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील दै.दिव्य मराठी वृत्तपत्र समुहाच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान अहमदनगर येथे झालेल्या सन्मान नारी शक्तीचा २०२३  सोहळ्यात समाजसेविका सौ.ममता सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की , मी कोयटे परिवारात आल्यानंतर कोयटे परिवाराला असलेली सामाजिक कार्याची आवड मलाही लागली आणि त्यानंतर समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांचे मार्गदर्शन, सहकार्यामुळे धार्मिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात काम करत गेले त्यावेळी त्यांनी दिलेला पाठिंब्यामुळेच आज माझा हा सन्मान होत आहे. याचे सारे श्रेय निवारा परिसरातील सर्व नागरिक, समता परिवारातील सर्व सदस्यांचा आहे.

सौ.सुहासिनी कोयटे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषवित असताना केलेली कामे ही आजही कोपरगावकरांच्या स्मरणात आहे.तसेच गत दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सहकार उद्यमी संचलित सहकार उद्योग मंदिराची स्थापना करून महिला बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करून दिला तसेच समता सहकार मिनी मॉलद्वारा महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला एक हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून दिले.उद्योग मंदिर व मिनी मॉलच्या माध्यमातून बचत गटांचे उत्पादित उत्पादनांचे पॅकिंग, ब्रॅण्डिंग व मार्केटिंग करण्याचे महिलांना आजही मार्गदर्शन करत आहे.तसेच कोरोना काळात दररोज जेवणाचे ९०० डबे मोफत वाटप करण्यात आले होते.आजही अंध, अनाथ, गरजूंना डबे वाटपाचे काम चालू आहे.

तसेच महादेव मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.जोत्सना पटेल मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की , समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय पोषण आहार समितीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असून दररोज १२०० विद्यार्थी व शिक्षक – शिक्षकेतर यांचे जेवण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होते. त्या दररोज विद्यार्थी आणि शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनवत असलेले जेवण हेच समता इंटरनॅशनल स्कूलच्या यशाचे गमक आहे. सौ सुहासिनी कोयटे यांनी तयार केलेल्या जेवणाची चव ही घरच्या जेवणापेक्षाही अधिक रुचकर असल्याने स्कूलमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना अन्नपूर्णा या नावाने संबोधतात.

सौ.सुहासिनी कोयटे यांच्या विषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की , महाराष्ट्रात वीरशैव सभेच्या महिला आघाडीचे अध्यक्षा असताना राज्यातील वीरशैव समाजाच्या महिलांना राज्यभर संघटित करण्याचे काम केले आहे तर निवारा परिसरातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे या मराठी माध्यम असलेल्या विद्यालयाची जबाबदारी ही गेल्या २० वर्षापासून समर्थपणे सांभाळत आहे. तसेच कोपरगाव शहरातील निवारा परिसरात निवारा भजनी मंडळ व महादेव मंदिर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करताना निवारा परिसरातील धार्मिक भावना जपत निवारा परिसरात एक धार्मिक वातावरण तयार केले आहे त्यांचे हे कार्य अग्रेसर असून प्रशंसनीय आहे.

यावेळी महादेव मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.जोत्सना पटेल, महाराष्ट्र राज्य दिव्य मराठी जाहिरात व्यवस्थापक श्री.सुभाष बोंद्रे, नगर ब्युरो चीफ श्री.अनिरुद्ध देवचक्के, श्री.राजेश भंडारी, व्यवस्थापक श्री.प्रमोद गवळी,उत्तर नगर व्यवस्थापक श्री.मनोज गावडे आदींसह दै.दिव्य मराठी वृत्तपत्र समुहाचे विविध पदाधिकारी, प्रतिनिधी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे