समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
संपादक , मार्गदर्शक श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे
समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
कोपरगाव–अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी केंद्रीत समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव येथे ७५वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सौ.सुधा कैलास ठोळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत उत्साहात संपन्न झाला.
समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्वश्री गुलाबचंद अग्रवाल, जितुभाई शहा, गुलशन होडे, भरत अजमेरे, निरव रावलिया,कचरू मोकळ, सौ.शोभा दरक यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
प्रसंगी कोपरगाव नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि समताच्या शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांनी प्रमुख पाहण्या सौ. सुधा कैलास ठोळे यांचा यथोचित शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषविले. शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांनी प्रमुख पाहुणे व प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला. तर उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांनी स्वागत केले.
तसेच इ.७ वी तील अन्वी उंबरकर हिने १५ ऑगस्ट १९४७ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणातील विचार स्वतःच्या भाषणातून व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली तर स्कूलच्या इतर विद्यार्थांनी देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्ये सादर केली. समता टायनी टॉटस मधील शौर्य शर्मा यानेही स्वातंत्र्याविषयी भाषणातून विचार व्यक्त केले. समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सादर केलेली भाषणे, समूह नृत्यांनी प्रभावित होऊन प्रमुख पाहुण्या सौ.सुधा कैलास ठोळे यांनीही त्यांच्या सुरेख आवाजात ‘ये मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत गायले आणि उपस्थितांमधील देशभक्तीची भावना जागृत करत मंत्र मुग्ध केले.
समता स्कूलचे शिक्षक श्री.रोहित महाले व मयूर पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इ. १० वी तील विद्यार्थी अन्वय बारहाते व मौली काले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.सुधा ठोळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, प्रमुख मान्यवर आदींनी विद्यार्थांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांना शुभेचा दिल्या तर काही विद्यार्थी व पालक यांनी फेसबुक द्वारा ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची विशेष परिश्रम घेतले. समता स्कूलच्या एल.के.जी. आणि यु.के.जी.तील विद्यार्थी समता स्कूलमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहिले तर हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचा ऑनलाइन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्कूलच्या सेकंडरी इनचार्ज सौ.शिल्पा वर्मा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.