ब्रेकिंग

समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सदिच्छा भेट..

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सदिच्छा भेट..

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संस्थेचे चेअरमन काका कोयटे, संचालक गुलशन होडे, राजकुमारजी बंब, सुधीर डागा, प्रदीप साखरे.

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सिंधुदुर्ग येथील सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.नितीन गोविंद वाळके, संचालक श्री.प्रकाश रघुनाथ वाळके,श्री. नंदन मेघशाम वेंगुर्लेकर, श्री.संदीप प्रभाकर टोपले, सल्लागार श्री.अमित भालचंद्र पंडित यांनी ६ फेब्रुवारी रोजी आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.विठ्ठलराव शंकरराव चासकर, संचालक श्री. कचरू भागुजी सहाणे, जनरल मॅनेजर श्री.राधाकिसन ममताजी धुमाळ, शाखाधिकारी श्री.भागवत सहाणे, श्री.नितीन वाकचौरे, श्री.संतोष बनसोडे, श्री.सचिन सहाणे, श्री.पंढरीनाथ बेनके, श्री.योगेश नाईकवाडी, वसुली अधिकारी श्री. बाळासाहेब भोर आदी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सदिच्छा भेट दिली.

अकोले येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना वसुली अधिकारी जनार्दन कदम.

या वेळी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी त्यांचे स्वागत करत त्यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज,भव्य इमारत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड,फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग या पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक बँकिंग प्रणाली आणि समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती, घी बत्ती, कापूर, हँडवॉश, उटणे, फुलवाती, समई वाती, अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ, मास्क, पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली. त्यानंतर ठेव प्रमुख श्री. संजय पारखे, शाखाधिकारी श्री.आप्पा कोल्हे आणि समता महिला बचत गटाच्या महिला, कर्मचारी यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच समता पतसंस्थेचे संचालक श्री.गुलशन होडे, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असो.चे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.सुधीर डागा, सचिव श्री.प्रदीप साखरे, वसुली अधिकारी श्री. जनार्दन कदम यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत समता पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे