ब्रेकिंग

समताच्या जडणघडणीत जितुभाईंचा सिंहाचा वाटा – जेष्ठ संचालक श्री.अरविंद पटेल

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताच्या जडणघडणीत जितुभाईंचा सिंहाचा वाटा – जेष्ठ संचालक श्री.अरविंद पटेल

समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे व जेष्ठ संचालक श्री. रामचंद्र बागरेचा यांच्या हस्ते जेष्ठ संचालक श्री.जितुभाई शहा यांचा सत्कार करताना. समवेत संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी.

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेत आणि जडणघडणीत काकांसोबत संस्थेचे ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा यांचा सिंहाचा वाटा आहे.समता परिवाराच्या सुख दुःखात त्यांची साथ काकांना असते. तसेच त्यांनी प्रत्येकाला मदतीचा हात ही दिलेला आहे.केंद्रात देशाचे प्रतिनिधित्व करताना देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने नरेंद्र मोदींनी नियम, वेगवेगळ्या योजना मंजूर करणे आणि अमित शहा त्या देशात राबवत असतात. त्या प्रमाणेच समता पतसंस्थेतही सभासद, कर्मचारी यांच्या हिताचे नियम,वेगवेगळ्या योजना काका सुचवितात आणि जितुभाई त्या समतात राबवितात.असे प्रतिपादन समता नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. अरविंद पटेल यांनी काढले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेत संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.जितुभाई शहा यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे आणि ज्येष्ठ संचालक श्री. रामचंद्र बागरेचा यांच्या हस्ते श्री. जितुभाई शहा यांचा सत्कार करत त्यांनी पेढा भरविला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ संचालक श्री.जितुभाई शहा म्हणाले की, संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी काकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक सेवक हा संस्थेच्या स्थापनेपासून शिस्त आणि प्रामाणिकपणे काम करीत आलेला आहे. या पुढेही प्रत्येक सेवकाने शिस्त व प्रामाणिकपणे काम करून संस्थेची अधिकाधिक आर्थिक भरभराट करावी.

प्रसंगी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे श्री. तुलसीदास खुबाणी, श्री.राजेंद्र शिरोडे, कोपरगाव पीपल्स बँकेचे संचालक श्री.सत्येन मुंदडा, श्री.किरण शिरोडे व सदस्य, कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक श्री.रविंद्र पाठक यांनी उपस्थित राहून सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे, श्री.गुलशन होडे, मुख्य कार्यालयातील अधिकारी, कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी,हितचिंतक यांनी ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शाखेचे कर्मचारी श्री.महेश भावसार यांनी मनोगतातून शुभेछा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, उपस्थितांचे आभार मुख्य कार्यालयाच्या एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे