देश-विदेशब्रेकिंग

कोरियात ही समता पतसंस्थेचा गौरव…

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

कोरियात ही समता पतसंस्थेचा गौरव…

कोपरगाव : अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन योजना, उपक्रम व सभासद हित जोपासणारी समता नागरी सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे. या पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन या संस्थांद्वारा देशातील सहकार आणि सहकारी पतसंस्थांची चळवळ परदेशात घेऊन गेले आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, सभासद हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता पतसंस्थेचा झेंडा ही त्यांनी परदेशात फडकविलेला आहे. त्या झेंड्याला झालर देण्याचे काम समता नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी केले आहे. समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व विविध कार्यप्रणालीमुळे कोरियाच्या पतसंस्था चळवळीत एक नवीन ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे समता परिवाराच्यावतीने संस्थेच्या संचालकांच्या हस्ते त्यांचा स्व. मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.

सहकारी पतसंस्था चळवळ सर्वात प्रगत, शिस्तबद्ध व सुदृढ समजल्या जाणाऱ्या नॅशनल को – ऑप. क्रेडिट युनियन फेडरेशन ऑफ कोरियाच्यावतीने २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी भारतातून एकमेव निवड झालेले सचिन भट्टड यांनी ‘समताच्या व्यवसाय वृद्धीसाठी केले जाणारे वेगवेगळे उपाय व योजना’ या विषयावर चित्रफितीच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण करत उत्कृष्ट सादरीकरण व उत्तम प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान मिळविला. त्यामुळे सचिन भट्टड यांचा कोरिया फेडरेशनच्या वतीने सन्मान करून गौरव करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीमुळे संस्थेचा ही गौरव झाला आहे. या वेळी कोरियातील सेऊल येथील मेरियट येथे वेगवेगळ्या देशातील पतसंस्था फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व १६ देशातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्व विकास, संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले गेले आहे.

भट्टड यांनी समता पतसंस्थेत क्लार्क पासून ते सरव्यवस्थापक पदापर्यंत स्वकर्तृत्वाने मजल मारली असून गेल्या २५ वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून ग्राहक, सभासदांना प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. त्यांनी २०१५ मध्ये सरव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या ठेवी २७४ कोटी ७५ लाख इतक्या होत्या, आज २०२३ अखेरीस ८८१ कोटी ७३ लाख इतक्या झाल्या आहेत. समताला भेटी देण्यासाठी येत असलेल्या विविध भागातील पतसंस्था देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत असतात. त्यांची बँकिंग क्षेत्राच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते.

या वेळी मुख्य कार्यालयातील बोर्ड सेक्रेटरी संतोष मुदबखे, ठेव विभाग प्रमुख संजय पारखे, शाखाधिकारी संजय मोरे (वैजापूर), सतीश जेजुरकर (शिर्डी), मिलिंद बनकर (राहाता) यांनी मनोगत व्यक्त करून अभिनंदन पर शुभेच्छा दिल्या. तर समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, ज्येष्ठ संचालक चांगदेव शिरोडे, जितूभाई शहा, कांतिलाल जोशी, गुलशन होडे, कचरू मोकळ, संदीप कोयटे, दिपक अग्रवाल, समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य कार्यालयाच्या एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे