ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता पतसंस्था महाराष्ट्रातील सुरक्षित संस्था – जनकराज खुराणा, चेअरमन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्था महाराष्ट्रातील सुरक्षित संस्था – जनकराज खुराणा, चेअरमन

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा ग्राहक सभासदांना सेवा देणारी संस्था असल्याचे आज प्रत्यक्षात पहायला मिळाले. समताच्या योजना व उपक्रम आम्हाला दिशादर्शक आहे. तसेच समतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधनच्या माध्यमातून देण्यात येणारे सुरक्षित सोनेतारण कर्ज वाटप व समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीममुळे समता पतसंस्था ही महाराष्ट्रातील सुरक्षित संस्था असल्याचे गौरवोद्गार हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जनकराज खुराणा यांनी काढले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जनकराज खुराणा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार सिंह, प्रशासकीय अधिकारी निलेश लाखकर, कर्ज विभाग प्रमुख कल्याण देशमुख, संगणक विभाग प्रमुख नितीन कापसे, खुराणा ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष जितेश खुराणा आदींनी सदिच्छा भेट दिली.

या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संचालक संदीप कोयटे, ई.डी.पी. विभाग प्रमुख योगेश आसने यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग आदी राज्यातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जनकराज खुराणा यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे व अधिकाऱ्यांचा सत्कार संचालक संदीप कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक जितुभाई शहा उपस्थित होते.

समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यप्रणाली विषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे