समताच्या मुख्य कार्यालयास महाराजा यशवंतराव होळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समताच्या मुख्य कार्यालयास महाराजा यशवंतराव होळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील महाराजा यशवंतराव होळकर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भोजाजी बनसोडे, सल्लागार समिती अध्यक्ष श्री शिवसांब तुकाराम महाजन,सक्रिय सभासद श्री रतन किसनराव साखरे आदींनी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सदिच्छा भेट दिली.
सदिच्छा भेटीप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा सत्कार केला. त्यानंतर समतातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करून मोबाइल बँकिंग, पेपरलेस बँकिंग, ऑडिट कंट्रोल रूम समता, रिकव्हरी पॅटर्न,सोनेतारण विभाग तसेच मुख्य कार्यालयातील कामकाजाची चर्चा केली आणि प्रत्यक्षात मुख्य कार्यालयाची माहिती संस्थेचे ऑडिट कंट्रोल रूम प्रमुख श्री संजय पारखे, लोन प्रमुख श्री निलेश देशमाने, वसुली प्रमुख श्री जनार्दन कदम यांनी सविस्तर दिली.
त्यानंंतर मुख्य कार्यालयाचे लोन विभागप्रमुख श्री निलेश देशमाने यांच्या हस्ते समता महिला बचत गटाद्वारा अगरबत्ती आणि कापूर एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ देऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समता पतसंस्थेविषयी मिळालेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त करत समताचे पदाधिकारी,अधिकारी यांनी दिलेली अनमोल माहिती आणि बहुमोल वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.