सहकारी पतसंस्था चळवळीचे संकट मोचक विखे साहेब – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकारी पतसंस्था चळवळीचे संकट मोचक विखे साहेब – काका कोयटे, अध्यक्ष
कोपरगाव : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे वेगवेगळे प्रश्न शासन दरबारी मांडायचे असेल तर सहकारी पतसंस्था चळवळीचे संकट मोचक मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळत असते. नोट बंदी, कोरोना किंवा इन्कम टॅक्सचा प्रश्न यासारखे अनेक सहकारी पतसंस्था चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न, सहकार खात्याचा विषय विखे साहेबांसमोर नेला की मार्ग निघाला समजा. आता शिर्डी मतदार संघातून अधिकच्या मताधिक्याने निवडून देऊन हा मार्ग पुन्हा एकदा खुला झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी प्रतिपादन केले.
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीचे संकट मोचक मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा १५ व्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून अधिकच्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले की, मा.राधाकृष्ण विखे साहेब हे महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, वैद्यकीय, क्षेत्रातील एक जाणते व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवामुळे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ बळकट बनविण्यास मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून सहकारी पतसंस्थांचे राज्यातील विविध प्रश्न सोडविण्यात यश मिळाले आहे. महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार वाढविण्यातही विखे परिवाराचे महत्त्वाचे योगदान आहे.